भोसे

गावाचे नांव:– भोसे, तालुका– मिरज

भोसे हे गाव निसर्गाच्या कुशीत भीमाशंकर ओठयाकाठी वसलेले गाव असून हिंदु, जैन व इतर धर्माचे काही प्रमाणात लोक राहतात. या गावाचे मारुती मंदिर हे ग्रामदैवत आहे. तर श्री मल्लमा मंदिर श्री कालेश्वर मंदिर, भगवान महावरी मंदिर, बिरोबा मंदिर, लक्ष्मी मंदिर, वेताहबा मंदिर, बनशंकरी मंदिर, म्हसोबा मंदिर व दंडनाथ मंदिरे अशी मंदिरे आहेत. दरवर्षी मार्गशिर्ष / पौष आमावास्येला श्री. यल्लमा देवीची यात्रा मोठया प्रमाणावर भरवली जाते या यात्रेस संागली सातारा सोलापूर कोल्हापूर जिल्हयातील लाखो भाविक येतात. तसेच शिवजयंती , हनुमान जयंती, भवान महावीर जयंती , डॉ. आंबेडकर जयंती, मोहरम सर्व गावकरी उत्साहात साजरी करतात.
हिंदुची व जैन धर्मियांची भजनी मंडळे असून भजनाचे अनेक कार्यक्रम होतात तसेच स्पर्धांचे दरवर्षी आयोजन केले जाते.
प्रशासन – भोसे ग्रामपंचायत , संजय नेमिशा चौगुले – सरपंच,
संगिता आनंदा बंडगर – उपसरपंच, सुनिल भूपाल चौगुले,
भिमराव महादेव कांबळे, शितल भूपाल पाटील, सौ. कल्पना तानाजी कदम, बाळासाो शामगौंडा पाटील, सुकुमार आण्णा पाटील, विनय गिराप्पा होवाळे , सौ. शालन पंढरीनाथ खामकर, प्रकाश तुकाराम मंडले, गजानन भगवान परीट, शंकुतला बाबासाो शिंदे, श्रीकांत राजाराम क्षीरसागर– ग्राम विकास अधिकारी, सौ. परवीन फिरोज अत्तार–कर्मचारी , चंद्रकांत शामराव पवार–शिपाई.