बुरुंगवाडी ग्राम पंचायत

चार भावंडे फार वर्षापूर्वी या ठिकाणी वास्तव्य करीत होते. त्या चौघा भावांचा विस्तार म्हणजे बुरुंगवाडी, छत्रपती शिवाजी महाराज यांचे दरबारी हे जाधव म्हणून प्रचलित होते. हया मावळयांना बुरुज पहारेकरी म्हणून नेमले होते. त्यामुळे जाधव ऐवजी बुरुजे हे पडनांव पडले. मधल्या इंग्रजांच्या राजवटीत इंग्रजी स्पेलिंगमध्ये घोटाळा झाला. तो असा ठनतनर ऐवजी ठनतनदह याप्रमाणे मराठीत उच्चार बुरुंग असा झाला. म्हणूनच बुरुंग यांची वाडी हीच बुरुंगवाडी. कालांतराने या ठिकाणी तावदूर माळी, सुर्यवंशी, देरे, हावलदार, मोहिते, चव्हाण, पानबुडे, मोहिते अशा अनेक आडनावाची मोठे कुटुंबे या ठिकाणी वास्तव्यास येऊन बुरुंगवाडीचा विस्तार झाला.