चिंचवाड़ ता. करवीर हे गांव कोल्हापूर शहरा पासून 10 कि. मी. अंतरवार पूर्वेस पंचगंगा नदीकाठी वसलेले आहे. या गावाला सुमारे 500 वर्षांचा इतिहास आहे. पंचगंगा नदीच्या काठाला केवळ नदीपासून अर्धा किलो मीटर अंतरावर वसल्याने पंचगंगा नदीच्या महापुरात या गावाला साभोवताली पाण्याचा वेढा पडायचा व या गावाला अक्ष्ारश्ाहा बेटाचे स्वरूप येत असे.
सन 1952 साली रेडीडोह फुटला व या गावाला पुराचा तडाखा बसला. गावातील अनेक घ्ारांत पाणी शिरल्याने अनेक कुटुंब पुरग्रस्त होऊन निराधार झाली. गाव भीषन संकटात असताना तत्कालीन कोल्हापूर जिल्हयाचे कलेक्टर कै. ए. यु. शेख्ा यांनी स्वत: पुराच्या पाण्यातुन गावात येउन पहाणी केली व या गावचे पुनर्वसन करावयाचा निर्णय दिला.
मे कलेक्टर साहेबांच्या मार्गदर्शनाने गावातील ता. 5/12/1952 इ. रोजी हौसिंग सोसायटीची स्थापना झाली व प्रशासन कामाला लागले. गावच्या नवीन वसाहतीची जागा निश्चित करण्यांत आली. चिचंवाड, वळीवडे व गडमुडशिंगी या गावातील गावच्या हद्दीवर जागा नियमित करुन एकूण्ा चाळीस एकर जागा ताब्यात घेऊन प्लॉट तयार करण्यात आला. मे कलेक्टर यांच्या आदेशाने टाउन प्लॅनिंग तयार होऊन रस्ते व प्लॉटची योजना आली. याच काळात प्रथम सार्वजनिक इमारती बांधण्यात आल्या. गांधीनगर येथून पिण्याचे पाणी आणण्यात आले. चावडी, शाळा, ग्रामपंचायत इमारत, सोसायटी या सर्व इमारती पूर्ण केल्या व सन 1952 ते 1961 पर्यंत गावातील लोकांनी आपल्या जुन्य़ा वसाहतीतील घरे पाडून नविन वसाहतीतील घरे बांधण्याचे काम धूम धडाक्याने सुरु झाले व साधारण 1962 पर्यंतनविन वसाहत पूर्ण झाली.
आशा प्रकारे चिंचवाड गावचे पूरग्रस्त म्हणून स्थलांतर झाले व आज हे गाव अध्यावत अशा प्रकारे सुशोभित झाले आहे.
गावातील पिण्याचा पाण्याच्या योजना, प्राथमिक शाळा, पाच दुध्ा संस्था व एक पाणी पुरवठा, सहा शेती संस्था अाहेत. रस्ते, गटारी या सुविधा काही प्रमाणात सोडून हे गाव आज समृध्दी बनले हे आहे.