घोगांव
घोगांव,
ता. पलूस, जि. सांगली.
प्रस्तावना–
- आदर्श खेडयाच्या रचनेप्रमाणे चौकोनात रस्ते आहेत. निसर्गरम्य परिसरात गाव वसले आहे. गाव पुर्नवसीत आहे गावात 40 x 125 चे प्लॉट पाडून सांगली जिल्हयाच्या उत्तरेस सांगली पासून 45 किलोमीटर अंतरावर कृष्णा नदीच्या तिरावर घोगांव वसले आहे. ताकारी पासून 3 किलोमीटर अंतरावर आहे जवळच ताकारी रेल्वे स्टेशन आहे. गावच्या दक्षिण बाजूस कृष्णा नदी उत्तरेस सतारेश्वराचे डोंगर, पुर्वेस कुंडल गाव हद्द पश्चिमेस दहयारी गावची हद्द आहे.
- घोगांव हे गाव कृष्णा नदीच्या तिरावर वसले होते. सन 1914 साली आलेल्या महापुरामुळे घोगांवचे जिवीत प्राणहानी व आर्थिक फार नुकसान झाले. त्यावेळी प्लेग पटकीची साथ उद्भवल्याने त्यानंतरशासनाने कृष्णा नदीपासुन 2 किमी. अंतरावर गावठानामध्ये मास्टर प्लॅननुसार प्लॉट पाडून नवीन घोगावची निर्मिती केली. पूर्वी गौतम ऋषींचे येणे वास्तव्य होते. तसेच सागरेश्वरास ऋषीमुनींना अभिषेक घालण्यासाठी दुध, दही येथून दिले जायचे त्यावरुन या गावामध्ये गायींची संख्या जास्त असलेमुळे या गावास गो गाव असे संबोधले जायचे त्याचे कालांतराने घोगांव असे नामकरण झाले. याचाउल्लेख सागरेश्वर महात्म या ग्रंथामध्ये देखील याचा उल्लेख आढळुन येतो. ‘‘औरंगजेबाने जुने घोगांव येथे एका रात्रीत मसजीद बांधकाम करुन घेतले आहे’’