गोनवडी

गावाचे नांव–गोनवडी, तेहसील

गोनवडी गावाचे ग्राम दैवत श्री बापुजीबुवा महाराज.  गोनवडी गावाचे मारुती मंदिरे व ग्राम दैवत गोनवडीच्या जुन्या गावठाणात फक्त मंदीरेच आहेत.  गोनवडीचा इतिहास जुन्या मंडळीच्या सांगण्यावरुन पस्तीस ते चाळीस वर्षाचे पुरुष मंडळी त्याठिकाणी मृत्यू पावत म्हणून गोनवडी वस्ती सर्व मोहिते/तनपुरे/सुकाळे/कान्हूकर/बेन्द्र मंडळी आपआपल्या शेतावर व ज्यांना घरासाठी जागा नाही अशा मंडळींनी गायराणात स्थलांतर केले त्याचप्रमाणे गोनवडी गावठाणात एक समाधीस्त मंदीर आहे त्या मंदीराचा इतिहास मिटकर महाराज भोसे ता. खेड जि.पुणे यांनी त्यांच्या चरीत्र पुस्तकात लिहीला आहे.  त्याचप्रमाणे पुणे येथील श्री. अॅड. उज्ज्वल निरगुडकर वकिल साहेब यांना या देवस्थानाचा साक्षात्कार झाला व त्यांनी गोनवडी शोधत येवून या ठिकाणी समाधीस्त महाराज यांचे मंदीर उभे केले आहे.  या मंदीराचा वाढदिवस 27 एप्रिलला साजरा केला जातो.  त्यावेळेस सर्व ग्रामस्थ भोजन करुन कार्यक्रम साजरा करतात.  त्याचप्रमाणे दत्त जयंतीला छोटा कार्यक्रम त्याठिकाणी केला जातो.  गोनवडी ग्रामदैवत श्री. बापुजीबुवा महाराजांची यात्रा चैत्रशु चतुर्थीला गोनवडी यात्रा भरते.  यात्रेला सात दिवसाचा सप्ताह भरवतात व यात्रेच्या दिवशी भारुडाचा कार्यक्रम ग्रामस्थ साजरा करतात.  त्याचप्रमाणे गोनवडी गावाला भामा नदी उत्तरेस, पूर्व पश्चिम वहाते व गावाच्या पूर्वेस पुन्हा उत्तर/दक्षिण वाहते.  गोनवडी जुना गावठाण/पान्हवटा/ स्मशानभूमी या ठिकाणी पांडवकालीण महादेवाची पिंड व नंदी, नदीच्या पात्रात कोरलेले आहेत. गोनवडी भामा नदीवर वरच्या बाजूस आसखड धरण असल्यामुळे गोनवडी नदीस (भामा) बारामहिने पाणी आहे.