कंदलगांव

कंदलगांवकंदलगांव हे कोल्हापुर शहर पासून 6 कि.मी. अंतरावर असून शहाराच्या दक्षिन बाजूस आहे. गावाचे ग्रामदैवत अंबाबाई व हजरत पिर हे दोन आहेत. गावात दोनच मुस्लिम कुटुंबे असुन सुद्धा दर वर्षी हनुमान जयंती नंतर येणा-या गुरुवारी दोन्ही देवतांची एक यात्रा भरवली जाते. त्याच्यासाठी गावातील सर्व लोकांच्या सहकार्यातून यात्रेमध्ये संस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धा इ. कार्यक्रम केले जातात. तसेच दर वर्षी गणेश चतुर्थी गावातील सर्व मंडळे शांततेत साजरी करतात.